महिला, मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

संगमनेर : शेतीच्या बांधावर गवत काढत असल्याचा राग आल्याने चौघा जणांनी महिला व तिच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी व गजाने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा येथे शुक्रवार दि. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास घडली.

याप्रकरणी तालुका पोलिसांनी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24