डंपर, ट्रक, ट्रॅक्टर, पिकअप नव्हे तर, मारुती व्हॅनमधून वाळू तस्करी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

संगमनेर – वाळू चोरणारे डंपर, ट्रक, ट्रॅक्टर, पिकअप जीप याचा वापर करतात, मात्र आता मारुती व्हॅनमधून वाळू तस्करी होत असल्याचे पोलिसांनी उघड केले.

काल संगमनेर तालुक्यात नाशिक – पुणे रस्त्यावर हिवरगाव पावसा शिवारात ४. १५ च्या सुमारास पोलिसांनी पांढऱ्या रंगाची ओमनी मारुती व्हॅन एमएच ०६ एफ ९५१९ पकडली. तिच्यात पांढऱ्या रंगाच्या ३० गोण्यांमध्ये चोरीची वाळू मिळून आली.

याप्रकरणी पो.ना मनोज पाटील यांच्या फिर्यादीवरुन आरोपी प्रशांत पोपट घेगडमल, रा. कासारवाडी, ता. संगमनेर याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24