अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोला : अनैसर्गिक लैंगिक संबंधासाठी पत्नीवर जबरदस्ती करणाऱ्या पाथर्डी येथील पती, सासरची मंडळी आणि अकोल्यातील एका नातेवाइकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
खदान पोलीस ठाण्यांतर्गत राहणाऱ्या २२ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, विवाहितेची पाच लाख रुपयांमध्ये विक्री करून लग्न लावून देण्यात आले होते. तिचे लग्न पाथर्डी येथील बांधकाम व्यावसायिक असलेल्या ४५ वर्षाच्या इसमासोबत लग्न झाले.
काही दिवसानंतर पतीने तिला अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्यासाठी बाध्य केले. विवाहितेने पतीला विरोध करूनही पतीने सातत्याने तिचे अनैसर्गिक लैंगिक शोषण केले.
तिने नकार दिल्यास पती तिला नेहमी मारहाण व धमकी देत असतं. नातेवाइकांनीसुद्धा तिला पाच लाख रुपयांमध्ये तिची विक्री केली होती.
त्यामुळे पती सातत्याने विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करायचा. याबाबत सासरच्या नातेवाइकांना सांगितल्यावरही त्यांनी दुर्लक्ष केले.
या छळाला कंटाळून विवाहितेने अखेर अकोला गाठले आणि खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पती, नणंद , पतीचे सहा मित्र यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.