औरंगाबाद – शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांना १९ नाेव्हेंबर राेजी सुनावणीस हजर राहण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी दिले आहेत.
हावरे यांनी ५० विषयांच्या मंजुरीसाठी देवस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीचे आयोजन केले हाेते. खंडपीठाने शिर्डीच्या दैनंदिन कारभारासाठी चार सदस्यीय समिती नियुक्त केलेली आहे.
मात्र ५० विषयांची यादी न्यायालयात सादर करणाऱ्या शिर्डी संस्थानच्या वकिलासह हावरे यांनी मेल करून अशा प्रकारे खंडपीठात माहिती सादर करण्यावर आक्षेप घेतला हाेता. यापूर्वीच खंडपीठाने हावरे यांच्यावर अवमान नोटीस बजावलेली आहे.