भ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रयत्न व्हावेत : शालिनी विखे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

शिर्डी: आपल्याकडे अजूनही मुलांचा आग्रह धरला जातो. यातून स्त्रीभ्रूण हत्या होते. हे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे यांनी सांगितले.

प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (पीन्स) अभिमत विद्यापीठ लोणी यांच्या प्रसूती व स्त्रीरोग विभागाच्या वतीने बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्रात महिलांच्या आरोग्याविषयी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी अमेरिकास्थित आरोग्य विद्यापीठातील प्रा. डॉ. ज्युडी लुईस होत्या. याप्रसंगी केंद्राचे संचालक डाॅ. संभाजी नालकर, डॉ. विद्याधर बंगाळ, तसेच विविध देशांतील डॉक्टर उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24