पोलिसांच्या दुर्लक्षाने पती-पत्नीचा खून !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीगोंदे :- एक महिन्यापूर्वी गोरख भदे व त्यांची पत्नी सुरेखा भदे यांना जाळून मारण्यात आले. याबाबात खुनाचा गुन्हा दाखल झाला. या दोघांच्या जबाबात पोलिस यंत्रणेने वेळेवर दखल घेतली नसल्याने त्यांची हत्या आरोपीने केली.

या खुनाचा निःपक्षपातीपणे तपास व्हावा, यासाठी तहसील कार्यालयासमोर प्रहार संघटनेचे साहेबराव रासकर यांच्यासह नातेवाईक, तर दुसऱ्या घटनेत पोलिसांनी मारहाण केली असल्याने कोकणगावमधील कुटुंब सोमवारी उपोषणाला बसले आहेत.

गोरख भदे व शरद भदे यांच्या शेतजमिनीचा वाद २०१७ पासून सुरू होता. याबाबत मृत गोरख भदे वारंवार पोलिस स्टेशनला तक्रार देत होते. मात्र, पोलिसांनी दुर्लक्ष केले. या मुळे गोरख भदे व त्यांच्या पत्नीची हत्या झाली. याबाबत गुन्हा दाखल असला, तरी नि:पक्षपातीपणे व्हावा. खऱ्या गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करावेत. खोटे गुन्हेगार कोण आहेत याची खात्री करून ते कमी करावेत.

तपासी अंमलदार यांची खातेनिहाय चौकशी व्हावी; यासाठी नातेवाईक उपोषणाला बसले आहेत. दुसऱ्या उपोषणाला यशोदीप रतन आरू हे नातेवाईकांसह उपोषणाला बसले. १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी वस्तीवर आलेले एलसीबीचे पोलिस यांनी चुलतभाऊ वैभव शेंडगे व विशाल शेंडगेंसह मला पोलिसांनी मारहाण केली.

माझ्या भावाने एक मुलगी पळून नेली याची आम्हाला माहिती नाही, तरी आम्हाला मारहाण केली. सात पोलिसांनी गाडीत बसवून आम्हाला आढळगावात ढकलून दिल्याने पोलिसांवर कारवाई व्हावी, यासाठी आरू कुटुंब उपोषणाला बसले. या दोन्ही प्रकरणी न्याय मिळावा, असे प्रहारचे जिल्हा संघटक साहेबराव रासकर म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24