नगर – जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात यादववाडी फाट्याजवळ शिरूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर विजय मारुती शिंदे, वय ३६, रा. भोवळगाव, ता. श्रीगोंदा हे दुचाकीवरुन जात होते.
त्याचवेळी मागील भांडणाच्या कारणातून आरोपी नाना आडोले, रा. यादववाडी, पारनेर व इतर दोन जण यांनी दुचाकीला दुचाकी आडवी घालून लाथाबुक्क्याने व हे काठीने बेदम मारहाण करुन शिवीगाळ केली.
जोडीदाराच्या खिशातून १० हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी विजय शिंदे यांनी बेलवंडी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी नाना आडोले व इतर तीन अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाथाबुक्क्याने व काठीने बेदम मारहाण करत १० हजार हिसकावले
जिल्हा परिषद अध्यक्षपद कोणाकडे ? शालिनी विखे की राजश्री घुले