अहमदनगर : बांध का कोरला अशी विचारणा केल्याच्या कारणावरून शेतकऱ्यास शिवीगाळ करून लोखंडी पाईपणे जबर मारहाण केली. या मारहाणीत अमोल महादेव दिवटे हे जखमी झाले असून, याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर असे की,श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील अमोल महादेव दिवटे यांनी माझ्या शेताचा बांध का कोरला अशी विचारणा केल्यावरून त्यांना बाबूराव लक्ष्मण दिवटे,नवनाथ लक्ष्मण दिवटे, सौ.रेणू बाबूराव दिवटे (सर्व.रा.पेडगाव) यांनी शिवीगाळ करून लोखंडी पाईपणे मारहाण केली.
तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत अमोल महादेव दिवटे हे जखमी झाले आहेत.या प्रकरणी दिवटे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोना.विकास वैराळ हे करत आहेत.
तर दुसरी फिर्याद बाबूराव लक्ष्मण दिवटे यांनी दिली, यात त्यांनी म्हटले आहे की,मी माझ्या शेताची नांगरणी केली असता.आरोपींनी बांध कोरल्याचा समज करून घेत त्याबाबत विचारणा करून सर्वांनी संगनमताने फिर्यादीस शिवीगाळ करून लोखंडी पाईपणे मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या मारहाणीत बाबूराव लक्ष्मण दिवटे,अनिकेत बापूराव दिवटे (दोघेही रा.पेडगाव) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी बाबूराव दिवटे यांच्या फिर्यादीवरून अमोल महादेव दिवटे (वय २९ वर्षे),प्रदिप दत्ता दिवटे,विनायक संजय दिवटे,महादेव रामा दिवटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अधिक तपास पोना.विकास वैराळ हे करत आहेत.