मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ करत बेकायदेशीर तलाक, पती व कुटुंबीयांवर गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीरामपूर – शहरात विवाहितेस मुलगी झाल्याने वारंवार छळ करून तसेच पैश्याची  मागणी करत बेकायदेशीर तलाक दिल्याप्रकरणी पतीसह तिच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  श्रीरामपूर शहरात वार्ड नं. १, आदर्शनगर येथे लग्नानंतर सासरी नांदत असताना विवाहित तरुणी सबिया अझहर पठाण, वय २८, हल्ली रा. अशोकनगर फाटा, निपाणी वडगाव, ता. श्रीरामपुर हिला पती, सासरा व सासरच्या लोकांनी तू माहेर हून श्रीरामपूर येथे स्वप्ननगरी येथे रो हाऊस बंगला घेण्यासाठी ३ लाख रुपये घेवून ये,
तसेच तुला मुलगी झाली आहे. आम्हाला मुलगा पाहिजे होता असे म्हणून वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास दिला.व माहेरुन पैसे आणण्याची मागणी केली. नवरा अझहर शबदर पठाण याने तलाक, तलाक, तलाक असे तीन वेळा म्हणून बेकायदेशीर तलाक देवून पत्नी सबिया पठाण हिला नांदविण्यास नकार दिला.
काल याप्रकरणी सबिया अझहर पठाण या विवाहित तरुणीने वरीलप्रमाणे श्रीरामपूर शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी नवरा अझहर शबदर पठाण, सासरा शबदर हमजेखा पठाण, सासू चांदबी शबदर पठाण, भाया आझाद शबदर पठाण, जावू मिनाज आझाद पठाण, सर्व रा. आदर्शनगर, वार्ड नं. १, श्रीरामपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24