श्रीरामपूर: नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोरच मोड फुटलेल्या सोयाबीनच्या ढिगाऱ्यास शेतकऱ्याने आग लावली. ही घटना बेलापूर खूर्द येथे घडली.
महाडीक यांच्या शेतातील सोयाबीनला मोड फुटल्याने ग्रामसेवक सी. डी. तुंबारे, कृषी अधिकारी तनपुरे, कोतवाल सुनील बाराहते हे पंचनामा करण्याकरता गेले होते.
पंचनामा, फोटो, सातबारा, विमा पावती आदींची पूर्तता केल्यानंतर शासन मदत तरी किती देणार यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने अधिकाऱ्यांसमक्षच सोयाबीनच्या गंजीस आग लावली.