निकालानंतर फटाके वाजविल्याने दोघांविरूद्ध गुन्हा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

सोनई : सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिवाडा राम जन्मभूमी व बाबरी मशिद याचे अनुषंगाने पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ठीकठिकाणी पोलीस पेट्रोलिंग व बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास रामजन्मभूमी व बाबरी मशिद खटल्याचा निकाल लागल्यानंतर सहाय्यक निरीक्षक सोनवणे, मुख्य हवालदार आव्हाड, पोलीस नाईक पालवे, हवालदार बाबा वाघमोडे असे सोनई गावातून ग्रामपंचायत पेठेमधून पेट्रोलिंग करत असताना गणेश विष्णु हरदे,

अशोक विष्णू हरदे (रा. सोनई) हे स्वत:च्या घराच्या छतावरती फटाके उडत असल्याचे फटाक्याच्या आवाजावरून निष्पन्न झाले. त्यांना ताब्यात घेऊन सोनई पोलीस ठाण्यात भादंवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुख्य हवालदार आव्हाड हे करत आहेत

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24