कामारेड्डी – तेलंगणातील कामारेड्डी जिल्हाधिकारी एन. सत्यनारायण यांनी सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यासाठी एक मोहिम सुरू केली आहे.
यात दोन किलो प्लॅस्टिक दिल्यास ६ अंडी देण्यात येतात. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व पंचायत, मंडळ व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी ही मोहिम यशस्वीपणे राबवण्याचे आदेश दिले आहेत.
व्यापारी असोसिएशनची एक समिती स्थापन करण्यात आली असून त्यांनी अंड्याचा पुरेसा पुरवठा करावा, असे आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयास लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. गेल्या तीन महिन्यात तीन नगरपालिकांमध्ये १४९९० किलो सिंगल युज प्लॅस्टिक गोळा करण्यात आले आहे.