नगर: तालुक्यातील जेऊर व परिसरातील गावांना विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. आ. तनपुरे हे शनिवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी जेऊर येथे आले असता, ते बोलत होते.
आ. तनपुरे यांनी पोपटराव गवारे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. या वेळी जेऊर ग्रामस्थांच्या वतीने तनपुरे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे, पोपटराव गवारे, राष्ट्रवादीचे नगर- राहुरी मतदारसंघ अध्यक्ष भास्कर मगर,
शामभाऊ विधाते, माजी ग्रा. पं. सदस्य दत्ता डोकडे, माजी उपसरपंच अरुण ससे यांनी जेऊर परिसरात करावयाची विकास कामे व समस्या आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या कानावर घातल्या.
या वेळी बोलताना आ. तनपुरे यांनी, जेऊर परिसरातील विकासकामांसाठी निधी कमी पडून देणार नाही तसेच तालुक्याला वाऱ्यावर न सोडता विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. कामांचा आराखडा तयार करून पुढील कामे करण्यात येणार असल्याचे आ. तनपुरे यांनी सांगितले.