नगर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणात आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायधीश ए. एस. खडसे यांनी १२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. लग्नाचे आमिष दाखवून आरोपी राहुल पंडित मगरे (१६, फकीरवाडी) याने गेल्या तीन वर्षांपासून १६ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची तक्रार देण्यात आली.
आरोपी हा बकऱ्या चारण्याचे काम करतो. १२ जुलै २०१६ रोजीपासून आरोपी अत्याचार करत होता. दिवाळी निमित्त पीडिता मावशीच्या गावी गेली होती. मात्र मुलीच्या शरीरात बदल दिसल्याने तिने पीडितेला फुलंब्री येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. तेव्हा ती सात महिन्यांची गर्भवती असल्याची महिती डॉक्टरांनी दिली.
आरोपीविरोधात हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून राहुल मगरेला शुक्रवारी सायंकाळी अटक केली. त्याला शनिवारी (दि. ९) जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांच्यासमोर हजर करण्यात आले.
सहायक लोकअभियोक्ता आर. सी. कुलकर्णी यांनी त्या दोघांची डीएनए चाचणी करावयाची आहे, वैद्यकीय तपासणी करावयाची असल्यामुळे पोलीस कोठडी देण्याची विनंती केली.