घडले असे काही की, सहा फेऱ्यानंतर वधू जागेवरच थांबली, म्हणाली…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

उत्तर प्रदेश/ कानपूर –  येथील  एका लग्न सोहळ्यात एक विचित्र घटना घडली. लग्न चालू असतानाच नवरी ने लग्न करण्यास नकार दिला आणि यामुळे सर्वत्र शांतता पसरली. 

नवरीने असे करण्याचे कारण म्हणजे तिचा होणारा पती. झाले असे कि लग्नात सप्तपदी चालू असताना सहा फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर नवरीला नवरदेवाच्या तोंडातून दारूचा वास येऊ लागला.
तोंडातून येणारा दारूचा वास आणि डगमगनारे पाय पाहून नवरीने जागीच लग्न न करण्याचा निर्णय घेतला. आणि सहाव्या फेऱ्यानंतर लग्न थांबविण्यात आले.

लग्नातील दोन्ही पक्षांनी नवरीला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र नवरीने आपला निर्णय बदलणार नाही असे ठणकावून सांगितले. त्यामुळे ही गोष्ट पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचली.

ही घटना उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील चीतपूर गावात घडली. 23 नोव्हेंबर रोजी वरात वाजत-गाजत वधू पक्षाकडे आली. वधू पक्षानेही मोठ्या मनाने वर पक्षाचे स्वागत केले.

काही विधी झाल्यानंतर सप्तपदीचा कार्यक्रम चालु झाला. यावेळी दारूच्या नशेत धुंद असलेल्या नवरदेवाने कसेबसे सहा फेरे पूर्ण केले. मात्र सहाव्या फेऱ्यानंतर वधू जागेवरच थांबली आणि आपण या दारूबाज व्यक्ती बरोबर लग्न करणार नाही असे ठणकावून सांगितले.

नवरीच्या तोंडातून हे शब्द निघाल्यानंतर लग्न मंडपात एकच शांतता पसरली. मुलीच्या नातेवाईकांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला मात्र ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली हे सर्व पाहून वर पक्षाने या घटनेला विरोध केला. खूप समजावल्यानंतरही मुलीने लग्न न करण्याचा निर्णय कायम ठेवला.

यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांसमोर दोन्ही पक्षांनी एकमेकांना दिलेले सामान माघारी घेतले आणि वरात नवरी न घेताच माघारी गेली. मुलीने घेतलेल्या या निर्णयामुळे गावात वेगवेगळी चर्चा होत असली तरी मुलीच्या या निर्णयाचे तिच्या आईवडिलांनी समर्थन केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24