नेल्सविलेमध्ये राहणाऱ्या या महिलेचे सिएरा स्ट्रँगफेल्ड असे नाव असून ५ सप्टेंबरला तिने शस्त्रक्रियेद्वारे सात महिन्याच्या अपुरी वाढ झालेल्या बाळाला जन्म दिला होता.
अनुवांशिक कारणांमुळे त्याचा तीन तासांतच मृत्यू झाला. सिएराने सांगितले की, तिच्या बाळाला ट्राइसोमी १८ नावाचा दुर्मिळ आजार होता. यामुळे जन्मावेळी त्याचे वजन अवघे ७७० ग्रॅम व उंची १२.५ इच होती. सिएराने आपला हा अनुभव सोशल मीडियावर पोस्ट केला.
त्यात तिने लिहिले आहे की, तुमचे मूल तुमच्याजवळ नसणे, ही अतिशय दु:खद गोष्ट आहे. अनेक मुलांना आईचे दूध मिळत नाही. सिएराचाही स्वत:च हाच अनुभव आहे. या पोस्टला आतापर्यंत २३ हजार लाइक्स मिळाले असून त्यावर २,८०० कॉमेंट्स आले आहेत. लोकांनी सिएराच्या निर्णयाचे कौैतुक केले आहे.
सिएरा सांगते की, २०व्या आठवड्यात बाळाच्या आजाराची माहिती मिळाल्यानंतर गर्भपात करण्याचा सवालच उपस्थित होत नव्हता व तो त्यावरचा पर्यायही नव्हता. बाळ वाचण्याची शक्यता अत्यल्प होती तरीही तिने त्याला जगात आणण्याचे ठरविले. ते तिच्यासोबत तीन तास राहिले. त्याच्या शरीराचा स्पर्श तिच्यासाठी असा होता की तास मिनिटांप्रमाणे निघून गेला. त्याचवेळी सिएराने अंगावरचे दूध दान करण्याचे ठरविले.