नगर – पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत, या कारणासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी पती, सासू-सासरे यांच्यासह पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
अभिजित ऊर्फ इनोक अरविंद मोरे, सासू जॅकलिन अरविंद मोरे ऊर्फ मॅन्यूअल, सासरा अरविंद गंगाधर मोरे ऊर्फ मॅन्यूअल दीर अनिमेश अरविंद मोरे ऊर्फ मॅन्यूअल व मार्गारेट गांगुड, नणंद सुषमा रॉबर्ट म्हस्के अशी आरोपींची नावे आहेत.
जोशना इनोक मॅन्यूअल असे फिर्याद देणाऱ्या पीडितेचे नाव आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्त वाढवली असून गुन्हेगारीला आळा घातला आहे.