आयशरला धडकल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

संगमनेर –  नाशिक-पुणे मार्गावरुन पुण्याच्या दिशेने मोटारसायकलीवर जाणारा महाविद्यालयीन विद्यार्थी पुढे असलेल्या आयशरवर पाठीमागून धडकला. 

आयशरला पाठीमागून धडकल्यानंतर रस्त्याच्या कडेला दुभाजकावर डोके आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. 

संगमनेरनजीक साकूरफाटा येथे मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास हा अपघात झाला. सुदीप मिरासे (वय २२, वसमत, जि. नांदेड) असे मृत युवकाचे नाव आहे. 

तो बीएचएमसच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. महामार्ग विभागाचे पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24