नगर –
राज्यभरातील अनेक छावण्यांमधील नागरिकांच्या प्रश्नांसंदर्भात मी विधानसभेत आवाज उठवला. तत्कालीन संरक्षण मंत्र्यांसमवेत बैठक घेण्याचेही ठरले होते. भिंगार येथील नागरिकांचे सर्व प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी दिले.
शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ भिंगारमध्ये झालेल्या प्रचारसभेत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, अंबादास पंधाडे, जिल्हा महिला आघाडीच्या आशा निंबाळकर, स्मिता अष्टेकर, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, अप्पासाहेब दातरंगे, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, मयूर जोशी, नीलेश साठे, संजय शेंडगे, अश्विनी मते, दिलीप सातपुते, कैलास गुजर आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, विद्यमान आमदारांनी भिंगारबाबतचे प्रश्न विधिमंडळात कधी उपस्थित केल्याचे मला आठवत नाही. आम्हाला मात्र येथील प्रश्न माहिती असून ते सोडवण्याचा प्रयत्न आहे.
झोडगे म्हणाले, भिंगारकरांना पाण्यासाठी आठ दिवस वाट पहावी लागते. हा प्रश्न तातडीने सोडवला पाहिजे. आतापर्यंत जी कामे भिंगारमध्ये झाली, ती राठोड यांच्या माध्यमातूनच.