धक्कादायक! दोन चिमुकल्यांचा गळा घोटून दाम्पत्याची आत्महत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

बेळगाव : गोकाक तालुक्यातील होसूर गावात शनिवारी रात्री पोटच्या दोन मुलांचा गळा घोटून दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला. भीमाप्पा सिद्धप्पा चुनप्पगोळ (वय ३०), मंजुळा चुनप्पगोळ (२५), प्रदीप (८) आणि मोहन (६) अशी मृतांची नावे आहेत. 

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेमागे नेमके कारण कोणते आहे, याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. पोलीस या घटनेचा कसून तपास करत असून, तपासाअंती याबाबतचे कारण कळण्यास मदत होणार आहे.

 भीमाप्पा चुनप्पगोळ यांनी पहिल्यांदा आपल्या दोन्ही मुलांना फास लावला. ते मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर लगेचच या दाम्पत्याने गळफास घेत आत्महत्या केली. 

दरम्यान, सिंडिकेट बँकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करत असलेले भीमाप्पा चुनप्पगोळ हे कर्जबाजारी झाले होते का, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत, तसेच या घटनेमागे आणखी कोणते कारण असू शकते का, याचाही गोकाक पोलीस शोध घेत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24