कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय होणार ६० वर्षे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नवी दिल्ली –  केंद्र सरकार केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी संबंधित नियमांत बदल करणार असून निवृत्तीचे वय ५८ ऐवजी ६० केले जाण्याची शक्यता आहे. 

ईपीएफओच्या नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या दुसऱ्या बैठकीत यावर विचार होऊ शकतो. केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणी होईल.

नियमात हा बदल करण्यासाठी ईपीएफ कायदा-१९५२ मध्ये दुरुस्ती करण्याची तयारी सुरू असून निवृत्तीच्या या वयात केला जात असलेला बदल जागतिक पातळीवर असलेल्या निवृत्तीच्या वयाचा विचार करून केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

जगातील बहुतांश देशांत पेन्शन फंडात निवृत्तीचे वय ६५ आहे. या पार्श्वभूमीवर भारतातही बदल करण्याची तयारी सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24