कोपरगाव : विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या आरोपी महादेव मनोहर जरीत (.आदमपूरवाडी ता. तेलारा, जि. अकोला) याच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महादेव जरीत फरार असून याचा तपास पोलिस घेत आहेत.
कोपरगाव शहरालगत असलेल्या रेल्वेस्टेशन जवळ राहणाऱ्या एका विवाहित महिलेला आरोपी महादेव मनोहर जरीत याने लग्नाचे आमिष दाखवले.
आरोपी जरीत याने वेळोवेळी तिच्यावर मर्जीविरुद्ध अत्याचार केला. पीडित महिलेने लग्नाचा विषय काढल्यावर मनोहर त्या महिलेला बाहेरगावी नेऊन अत्याचार करत वेळ निभावून नेत हेाता.
त्यानंतर याचा अचानक मोबाइल बंद करून आरोपी मनोहर जरीत गावी गेल्याचे महिलेला कळाले असता पीडित महिला त्याच्या गावी जाऊन भेटली.
लग्नाची विचारना केली, परंतु तो उडवाडवीची उत्तरे देत होता. याप्रकराने पीडित महिलेच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली आहे. त्यानंतर आरोपीच्या विरोधात तिने गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.
त्यावर पीडित महिलेने आरोपी महादेव मनोहर जरीत याच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.