वॉशिंग्टन : शास्त्रज्ञांनी सर्वात काळ्या पदार्थापेक्षाही जास्त काळ्या पदार्थ तयार केला आहे. हा पदार्थ ९९.९६ टक्के प्रकाश शोषून घेतो. आतापर्यंत बनविलेल्या सर्वात काळ्या पदार्थापेक्षा तो दहापटीने जास्त काळा आहे. मॅसाच्युसेट्स इ्स्टिटट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी या पदार्थाचा काळपटपणा सिद्ध करण्यासाठी १६ लाख पौंडाच्या हिऱ्याला त्याने आच्छादले.
कोळशासारखा हा हायटेक पदार्थ कार्बन नॅनोट्यूब्सपासून बनलेला असून तो ॲल्युमिनियम फॉइवनप विकसित करण्यात आला आहे. प्रकाशाचा ९९.९६ टक्के हिस्सा शोषून घेत असल्यामुळे त्यास आतापर्यंत बनलेल्या पदार्थांमध्ये सर्वाधिक काळा पदार्थ समजले जात आहे.
कोणत्या कारणांमुळे हा पदार्थ एवढा काळा बनला आहे, याचे कारण अद्याप शास्त्रज्ञांना कळू शकलेले नाही. मात्र असे समजले जाते की, कार्बन नॅनोट्यूब्स आणि क्लोरिन एच्ड ॲल्युमिनियमच्या मिश्रणामुळे असे झल्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, नॅनोट्यूब्स जेव्हा एखाद्या व्हर्टिकल फॉरेस्ट म्हणजे सरळ उभ्या जंगलाप्रमाणे जमा होतात,
तेव्हा त्यांच्यावर पडणारा सगळा प्रकाश उष्णतेत बदलू शकतात. विविध प्रकारच्या क्लोरिन एच्ज ॲल्युमिनियम फॉरेस्टला अतिशय काळे समजले जाते.
या अध्ययनाचे नेतृत्व करणारे प्राध्यापक वार्डले यांनी विद्यापीठातील आर्टिस्ट दीमुत स्ट्रेबे व माजी एमआयटी पोस्टडॉक केहांग यांच्या सोबतीने १६.७८ कॅरेट नैसर्गिक पिवळ्या हिऱ्याला अल्ट्राब्लॅक सीएनटी सामद्री बदलण्याचे काम केले. त्याने आश्चर्यजनक प्रभाव टाकण्याचे काम केले. सामान्य रुपात चमकदार दगडाला एका सपाट व काळ्या शून्यामध्ये बदलले.