नेवासे :- तपासी अधिकाऱ्यांने बारकाईने तपास करीत बारीक सारीक माहिती मिळवत बारकाईने गुन्ह्याचा तपास करून घोडेगाव पेट्रोलपंप दरोड्यातील आरोपीला अटक केली.
आरोपीने राहुरी तालुक्यातील गुहा येथील दरोड्यासह नगर-औरंगाबाद महामार्गावरील दोन जबरी चोरीच्या गुन्ह्याचीही कबुली दिली आहे. औरंगाबाद महामार्गावरील मनीषा पेट्रोलियम या पागिरे यांच्या पेट्रोल पंपावर गेल्या दरोडा पडला होता. याचा तपास सोनई ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांच्याकडे होता.
दरोड्याचे तपासाबाबत सहाय्यक निरीक्षक जनार्दन सोनवणे व तपास अधिकारी सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, हवालदार दत्तात्रय गावडे, नाईक शिवाजी माने यांना गुप्त माहिती मिळाली की, दरोड्यातील आरोपी सागर पोपट हरिचंन्द्रे हा धामोरी खुर्द येथे फिरत आहे.