‘उचकी’ येण्यामागचं कारण जाणून घ्या… अन 5 च मिनिटात करा बाय-बाय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

उचकी येणं ही एक साधारण बाब आहे. उचकी आल्यानंतर आपण अनेक उपाय करतो. काही वेळेस ही उचकी थांबते, तर काही वेळेस नाही. कित्येकदा उचकी लागल्यास आपण लगेचच पाणी पितो. 

उचकी येण्याची अनेक कारणे असतात. लगोपाठ उचकी येणे हा एक प्रकारचा आजार आहे. उचकी लागल्यावर तुम्ही खूप अस्वस्थ होता. उचकी रोखणे खूप अवघड होऊन जाते. असे मानले जाते की, डायफ्रामची मसल्स अचानक आकुंचन पावल्याने उचकीसारखी स्थिती निर्माण होते. म्हणून उचकी थांबण्यासाठी काही घरगुती उपाय नक्की करा. .

साखर : उचकी आल्यावर त्वरित एक चमचा साखर खा. यामुळे थोड्या वेळात उचकी थांबते. साखरेच्या पाण्यात थोडं मीठ टाकल्यास ते थोडे थोडे प्यायल्याने उचकी थोड्या वेळाने बंद होते. .

लिंबू आणि मध : उचकी आल्यावर एक चमचा लिंबाचा ताजा रस घ्या. त्यात एक चमचा मध टाका आणि दोघांना मिक्स करून चाटण करा. हे चाटण घेतल्यावर उचकी बंद होईल. .

हळूहळू जेवा : अनेक वेळा फास्ट खाल्ल्याने उचकी लागते, जेवताना हळूहळू आणि चावून जेवा, असे केल्यास उचकी थांबते. फास्ट खाल्ल्याने किंवा तिखट खाल्ल्याने उचकी लागते. .

आपला श्वास रोखून ठेवा : एक लांब श्वास घ्या आणि काही सेकंद रोखून ठेवा. जाणकारांनुसार फुप्फुसात कार्बन डाय-ऑक्साइड भरेल आणि डायफ्राम त्याला काढण्याचा प्रयत्न करेल, तर उचकी आपोआप थांबेल.

अहमदनगर लाईव्ह 24