अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- विविध आयुर्वेदिक उत्पादनांच्या व्यवसायाचे अमिष दाखवून नगर येथील एका हॉटेल व्यावसायिकास तब्बल १४ लाख १७ हजार रुपयांना ऑनलाईन गंडा घालणाऱ्या चौघांच्या नायजेरियन टोळीला येथील सायबर पोलिसांनी पुणे येथून जेरबंद केले आहे.
यात स्टॉन्ली स्मिथ(रा. मूळ नायजेरियन हल्ली रा.पिंपरी चिंचवड, पुणे), निलम गिरिषगोहेल उर्फ निशा शहा, अलेक्स ओड्डू उर्फ मार्क, अलेन उर्फ मिरॅकल (हल्ली सर्व रा.पिंपरी चिंचवड, पुणे) असे अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.
या चौघांनी मागील काही दिवसांपूर्वी केडगाव येथील ओंकार मधुकर भालेकर यांची तब्बल १४ लाखांची फसवणूक केली होती. आरोपींनी प्रथम भालेकर यांच्याशी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री केली.
त्यानंतर भारतातील हर्बल प्रोडक्ट कंपनीकडून आमच्या कंपनीला हर्बल ऑईल खरेदी करावयाचे आहे. या व्यवसायात तुम्ही सहभागी झालात तर तुम्हाला लाखो रुपये मिळतील असे आमिष दाखिवले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगाून भालेकर यांच्याकडून विविध बँक खात्यावर पैसे भरण्यास सांगितले.
मात्र आता या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर भालेकर यांनी येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक प्रतीक कोळी, हेड कॉस्टेबल योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर यांच्या पथकाने तपास करून आरोपींना पुणे येथून अटक केली.
या आरोपींना न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपींकडून १मोबाईल, विविध बँकांचे दहा पासबुक, आठ एटीएम कार्ड असा एकूण ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे निरिक्षक मधुकर साळवे, उपनिरिक्षक प्रतिक कोळी, हेड कॉस्टेबल योगेश गोसावी, उमेश खेडकर, पोलीस नाईक दिगंबर कारखेले, विशाल अमृते, राहुल हुसळे,
गणेश पाटील, राहुल गुंडू, अमोल गायकवाड, अभिजित अरकल, अरुण सांगळे, वासुदेव शेलार, सविता खताळ, पूजा भांगरे, प्रितम गायकवाड, उर्मिला चेके, दिपाली घोडके, सीमा भांगरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.