अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- निर्भया चे वडील म्हणतात की जर तुरुंग प्रशासन परवानगी देणार असेल तर ज्या ठिकाणी या चौघांना फाशी देण्यात येणार आहे त्या ठिकाणी मला उपस्थित राहायचय. आम्ही त्या नराधमांना फासावर लटकताना पाहायच आहे.
ते सांगतात की जेल चे कायदे काय आहेत याबाबत मला पूर्ण माहिती नाही मात्र जर जेल प्रशासन मला परवानगी देत असेल तर मी त्यावेळी तिथे उपस्थित राहू इच्छितो, ज्यावेळी त्या चौघांना फाशी देण्यात येणार आहे.
सांगितले जात आहे की यासंदर्भात ते तुरुंग प्रशासनाला पत्र लिहू शकतात. निर्भयाचे पिता सांगतात की त्यांना सर्वात जास्त दुःख तेव्हा होते जेव्हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी एवढा आटापिटा करावा लागतो.
सात वर्षे झाले तरी अजूनही माझ्या मुलीचे अपराधी जिवंत आहेत. ही एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येक आई-बापाला व्यथित करणारी आहे. ते पुढे असेही म्हणाले की निर्भया माझी पहिली मुलगी होती ती अभ्यासामध्ये खूपच हुशार होती तिची इच्छा होती की ती डॉक्टर होईल.
मात्र आर्थिक परिस्थितीमुळे हे शक्य होताना दिसत नव्हते तरीही तिने अत्यंत प्रयत्नाने पॅरामेडिकल मध्ये ॲडमिशन मिळवले. निर्भयाच्या वडलांनी तिला एकदा भेटवस्तू म्हणून पेन दिला होता.
याच पेनाने निर्भया ने आपली डायरी लिहिण्यास सुरुवात केली होती ती डायरी आज सुद्धा त्यांनी जपून ठेवले आहे. डायरीमध्ये तिने आपल्या शाळेच्या पहिल्या दिवसाचा प्रसंग लिहिला आहे.
त्याचबरोबर तिचे जगाविषयी असणारे विचार, तिला काय आवडतं, काय नाही आवडत याबाबत सुद्धा मत मांडले होते. यामध्ये तिने असेही लिहिले आहे की मला खोट्या गोष्टींची खूप चीड आहे. सकारात्मक विचार आणि कष्ट हीच माझी जमेची बाजू आहे.