अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : निसर्ग चक्रीवादळाने कोपरगाव तालुक्याला तडाखा बसला असून कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या आसवानी विभागाची 125 फुटाची चिमणी कोसळली. यात कुठलीही जीवित हानी झालेली नाही.
जोरदार वारे सुरू झाल्याने सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास काळे कर्मवीर काळे कारखान्याच्या झिरो लिक्विड डिस्चार्ज प्रकल्पाची 125 फुट उंचीची चिमणी हवेच्या तडाख्याने कोसळली.
चक्रीवादळाचा जोर वाढल्यानंतर त्याचे लोन कोपरगाव तालुक्यात पोहोचले. या वादळाची गती साधारण 60 ते 70 किलोमीटर वेगाने दक्षिणेकडून उत्तरेकडे होती.
तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या आसवनी विभागाच्या चिमणीला तडाखा बसल्याने ती कोसळली. दोन वर्षांपूर्वी या प्रकल्पाचे काम पुण्याच्या एका कंपनीने केले असून तीच कंपनीच व्यवस्थापनही बघत असल्याचे कळते.
साडेपाच वाजेच्या सुमारास कर्मचारी कारखान्यातून बाहेर पडतात चिमणी कोसळली. हवेबरोबर पावसाच्या चांगल्या सरी कोसळू लागल्या होत्या.
खबरदारी म्हणून दुपारपासूनच संपूर्ण शहर व तालुक्यातील वीज पूर्णतः बंद करण्यात आली होती. याशिवाय धोत्रे गावातील ४ शेडचे पत्रे उडाले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews