अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :- चुकीला माफी नाही याचा प्रत्यय श्रीरामपूर शहरात आमदारांच्या ड्रायव्हरला झाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये शहर पोलिस व नगरपालिका प्रशासनाने नागरिकांच्या हितासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांची कठोर अंमलबजावणी सुरू केली
असून मास्क न लावता गाडी चालवणारे आमदार लहू कानडे यांच्या ड्रायव्हरला सुद्धा दंड आकारून त्याच्याकडून पाचशे रुपयाची वसुली नगरपालिका कर्मचाऱ्यांनी केली.
पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन संयुक्तपणे शहरांमध्ये जनतेच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. दररोज सकाळी शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या मास्क न लावणाऱ्या व रस्त्यावर थुंकणाऱ्या गावकऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे. यासाठी नगरपालिकेने चार टीम तयार केल्या आहेत.
शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यअधिकारी प्रकाश जाधव, आरोग्य अधिकारी आरणे,पालिकेचे कर्मचारी व पोलिस अशा दोन्ही यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करीत आहेत.
राज्यांमध्ये सर्वत्र कोरोनाचे थैमान सुरू असताना स्थानिक अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन करून शहरांमध्ये कुठेही पेशंट आढळणार नाही यासाठी पुरेपूर काळजी घेतली जात आहे. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन मध्ये शितिलथा देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू असून
त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही यासाठी पोलीस व पालिका प्रशासनाने शहरांमध्ये येणाऱ्या लोकांची नाकेबंदी करावी . नवीन लोकांना शहरात येऊ देऊ नये . सबळ कारण असल्याशिवाय कोणालाही जाण्या-येण्याची परवानगी देऊ नये . अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®