अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याने कोरोनाला हरविले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  राहाता संगमने, वैजापूर, सिन्नर, येवला व लासलगाव असा चोहोबाजूंनी रेड झोन मध्ये घेरलेलो असताना गेल्या 55 दिवसात कोपरगाव नगरपालिका आणि कोपरगाव ग्रामीण क्षेत्रात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही.

कोपरगावसाठी ही आनंदाची बाब आहे. तालुक्यातील ७९ जणांची आजअखेर कोरोना तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७३ जणांना नगरच्या शासकीय रुग्णालयात पाठवले होते.

आता कोपरगावच्या एसएसजीएम मुलींच्या वसतिगृहातील कोरोना केअर सेंटरमधे स्वॅब घेण्याची सोय झाली असून सहा जणांचे स्वॅब तेथे घेण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचे आरोग्य, नगरपालिका, पंचायत समिती, पोलिस सर्व विभागाने काटेकोर नियोजन केले आहे.

तालुक्यात एकूण १०६५६ व्यक्ती बाहेरून आल्या आहेत. जिल्ह्याबाहेरील ९३७८, राज्याबाहेरून ३०० देशाबाहेरून ८० व्यक्ती आल्या आहेत. १ मेनंतर आलेल्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन केले जात आहे.

एकूण १६४७ जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन केले गेले. १०६० जणांनी क्वारंटाइन पूर्ण केले. बाहेरगावहून व्यक्ती आल्यास आरोग्य विभागास माहिती द्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते यांनी केले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24