यापुढे परदेशातून कांदा आयात करण्याची गरज पडणार नाही!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- कांद्याचे दर वाढल्यानंतर सरकारसह सर्वांच्याच अडचणी वाढल्या होत्या. मात्र भविष्यात परत अशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून सरकारने यासाठी  उपाययोजना केल्या आहेत.

या समस्येवर मात करण्यासाठी देशांतर्गत कांद्याचा बफर स्टॉक वाढवण्यात आला असून, यामुळे कांद्याच्या वाढत्या किंमती वाढणार नाहीत. तसेच परदेशातून कांदा आयात करण्याची गरज पडणार नाही.

कांद्याच्या वाढत्या किमतीवर उपाययोजना म्हणून केंद्र सरकार कांद्याचा बफर स्टॉक १ लाख टनने वाढून १.५ लाख टन करणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात कांद्याच्या किंमतीत वाढ होताना दिसणार नाही.

तसेच जेव्हा मार्केटमध्ये कांद्याची कमी निर्माण होईल तेव्हा हा कांदा बाजारात विक्रीसाठी उतरवला जाईल. देशाअंतर्गतच कांद्याचा इतका साठा केला जाईल जेणेकरून बाहेरच्या देशातून कांदा आणण्याची वेळ येणार नाही.

यावर्षी कांद्याच्या जास्त मागणीमुळे सरकारने विदेशातून कांदा मागवला होता. परंतु जर देशातच बफर स्टॉक राहील्यास परदेशातून कांदा आयात करण्याची गरज भासणार नाही.

सरकारच्या या योजनेअंतर्गत रब्बी हंगामात उत्पादित होणारा कांदा सरकारकडून खरेदी केला जाईल. दि.२३ ऑक्टोबरपासून रिटेल आणि होलसेलमध्ये कांदा साठवणुकीची मर्यादा लागू करण्यात असून रिटेल व्यापाऱ्यांसाठी ती मर्यादा २ टन तर घाऊक विक्रेत्यांसाठी २५ टन इतकी आहे. सरकारने ऑक्टोबरमध्ये कांदा निर्यात थांबवली होती.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24