अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन कोल्हापूरला रवाना झालेले राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ शुक्रवारी कोरोनाबाधित झाले.
त्यांनी स्वतः सोशल मीडियावर माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी. लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन, माझी तब्येत उत्तम आहे,
असे स्पष्ट केले. मुश्रीफ पाॅझिटिव्ह निघाल्याने गुरुवारी बैठकीला असलेले राजकीय नेते, महसूल, पोलिस व आरोग्य अधिकारी, तसेच त्यांना भेटलेल्या मंडळींची धाकधूक वाढली आहे.
जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री मुश्रीफ गुरुवारी नगरला आले होते. बैठक व पत्रकार परिषद घेऊन ते कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या आपल्या मतदारसंघाकडे रवाना झाले.
पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी माझे थोरले बंधू कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यासाठी लवकर जायचे असल्याचे सांगितले होते. कोल्हापूरला गेल्यानंतर शुक्रवारी त्यांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला.
मुश्रीफ बाधित आढळल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांच्यासमवेत असलेल्या राजकीय नेत्यांसह महसूल, पोलिस, आरोग्य व अन्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांची धाकधूक वाढली आहे.
तथापि, बैठकीदरम्यान मंत्री मुश्रीफ यांच्या थेट संपर्कात कोणीच आले नव्हते, तरीदेखील संपर्कात आलेल्या व्यक्तींनी चार दिवस सेल्फ क्वारंटाइन व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी केले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved