अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- राजकारणात व जीवनात चढ उतार येत राहातात त्यामुळे पराभवाचे शल्य मनाशी न बाळगता नव्या उमेदीने राजकारणात सक्रीय राहणार असल्याचे प्रतिपादन विधानसभेचे माजी उपसभापती विजयराव औटी यांनी केले आहे.
तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता बाळगावी म्हणून काही काळ शांत होतो. आपण राजकारणापासून बाजूला गेलो असा कुणाचा समज असेल तर तो चुकीचा असल्याचे सांगत सक्रिय राजकारणात राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पण राजकारणापासून बाजूला गेलो असा कुणाचा समज असेल तर तो चुकीचा असल्याचे सांगत सक्रिय राजकारणात राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पारनेर येथे शिवसेनेच्या सभासद नोंदणीस सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते. सेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा परिषदेचे सभापती काशिनाथ दाते,
जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, तालुकाप्रमुख विकास रोहोकले, डॉ. वर्षा पुजारी, डॉ. श्रीकांत पठारे, नितीन शेळके, विजय डोळ, नीलेश खोडदे, शिरीष साळवे, भरत औटी यावेळी उपस्थित होते.
माजी आ. औटी म्हणाले की, आपला पराभव झाला याचा अर्थ आपण राजकारणातून बाहेर गेलो असे कोणी समजू नये. राजकारणात कोण कोठे जातात, येतात? यावर आपण बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगत त्यांनी पक्षांतर केलेल्या नगरसेवकांना चिमटा काढला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved