नेवासा : तालुक्यातील शिरसगाव येथे एकाने शाळेत दुपारच्या सुट्टीत वर्गात शिरून एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना दि. ६ डिसेंबर राजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.
यावर मुलीचे वडील समजाऊन सांगण्यासाठी गेले असता, त्यांना मारहाणही करण्यात आली आहे. पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की तुषार राजेंद्र पोटे याने या विद्यार्थिनीच्या वर्गात जाऊन तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.
या प्रकारामुळे ती ओरडली असता शिक्षक पळत आले. त्यानंतर मुलीचे वडील बाहेर गावावरून आले.
ते आरोपी राजेंद्र काशिनाथ पोटे यास समजावून सांगण्यासाठी गेले असता, त्याचा राग येऊन त्यांना मारहाण करण्यात येऊन धमकी देण्यात आली.
या तक्रारीवरून वरील दोघा आरोपींविरुद्ध विनयभंग तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.