महाविकास आघाडी नसून महाभकास सरकार – पाचपुते

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीगोंदा:  सध्याचे महाविकासआघाडीचे सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे हे महाविकास करण्या ऐवजी शेतकरी भकास करणारे सरकार आहे अशी टीका  जिल्हा परिषद सदस्य व भाजप चे नेते सदाशिव पाचपुते यांनी तहसील कार्यालयासमोर केलेल्या निष्क्रिय सरकार च्या विरोधात भाजप च्या एल्गार आंदोलनात बोलताना केले. सध्याचे महाविकास सरकार च्या काळात सर्वात जास्त शेतकरी विरोधी निर्णय घेतले आहेत कर्जमाफी ची फसवी घोषणा केली अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.

अजूनही शेतकर्यांना मदत मिळाली नाही विजेचा प्रश्न तर अतिशय गंभीर केला आहे पूर्ण दाबाने पुरवठा करण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांचे वीजजोड तोडण्याचे काम सुरु केले आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. भाजप सरकार च्या काळात शेतकर्यांना पूर्ण दाबाने वीज पुरवठा होत होता रोहित्रासाठी वीज वितरण च्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत नव्हते पण आता १५ दिवस झाले तरी सुद्धा रोहित्रे मिळत नाहीत याचाच अर्थ या सरकारचा अधिकाऱ्यांवर वचक नाही सरकारच्या संगीत खुर्ची मुळे शेतकऱ्यांचे वाटोळे चालू आहे .

सौर ऊर्जेसाठी भाजप सरकारणे एकसूत्री कार्यक्रम हाती घेतला होता या योजनेमुळे गावे विजेच्या बाबतीत स्वयपूर्ण झाली असती पण या बिघाडी सरकारने  त्यातहि खोडा घातला आहे हि योजना जर पूर्णत्वास गेली तर श्रीगोंदा तालुक्यातील बहुतांशी गावे विजेच्या बाबतीत परिपूर्ण होतील असेही पाचपुते म्हणाले तर भाजप चे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे म्हणाले  वाढती गुन्हेगारी हाही महत्वाचा विषय आहे

या चार महिन्याच्या काळात सर्वात जास्त महिलांवर अत्याचार झाले चिमुरड्या बालकांवर अत्याचार वाढले ,प्रत्येक गावोगावी अवैध्य धंद्याचा सुळसुळाट झाला आहे त्यामूळे अनेकांचे संसार उध्वस्त होऊ लागले आहेत नगर सारख्या मोठ्या जिल्ह्याला पोलीस प्रमुख नाही प्रभारी राज असल्यामुळे जिल्ह्यात  कायदा व सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण झाला आहे.घोड कुकडी च्या पाण्याच्या प्रश्नात हि या सरकारने लक्ष घातले पाहिजे उन्हाळ्याची चाहूल लागली असल्यामुळे पाण्याचे नियोजन या सरकारने करणे गरजेचे आहे असे संदीप नागवडे म्हणाले .

या आंदोलनाच्या वेळी ई पि एस ९५  या संघटनेच्या मागण्या संधर्भात हि आवाज उठवण्यात आला  यावेळी संतोष लगड ,दादाराम ढवण,,माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडिक,उपनगराध्यक्ष अशोक खेंडके,जेष्ठ नेते पोपट खेतमाळीस,बाजार समितीचे उपसभापती वैभव पाचपुते, सतीषशेठ पोखरणा,शिवाजीराव जाधव, कार्याध्यक्ष राजेंद्र उकांडे, दत्तात्रय जगताप, दिपक शिंदे,नगरसेवक बापूसाहेब गोरे,

संग्राम घोडके प्रसिद्धी प्रमुख अमर छत्तीसे  शहाजी खेतमाळीस ,नंदू लाढाणे, अंबादास औटी ,महेश लांडे, संतोष खेतमाळीस,संतोष क्षीरसागर,माजी सैनिक सेलचे तालुकाध्यक्ष मेजर संतोष धोत्रे , मेजर दादा गदादे,दत्तात्रय पिटकर महावीर पटवा , प्रवीण मापारी, उमेश बोरुडे, अमोल अनभुले.  भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा सुहासिनी गांधी ,अनुजा गायकवाड ,सुवर्णा पाचपुते, प्रतिभाताई झिटे, मंदाकिनी शेलार,  डॉ.स्मिता तरटे,

नितीन नलगे ,दिपक हिरनावले,,नीलकंठ जंगले, भाऊसाहेब खेतमाळीस, जयंत होळकर, अशोक ईशवरे, उमेश घेगडे काकासाहेब कदम, ईपीएस पेन्शनर संघटनेचे पोखरकर, भगवानराव वाळके, संपतराव समिंदर,विलासराव भोसले, शहाजी वाकडे, राजेंद्र पाचपुते, दत्तात्रय डांगे,रोहित गायकवाड ,सतीष काळे , गणेश अडागळे, योगेश सावंत,  आदी  कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24