दुधाविषयी निर्णय नाहीच; दूध ‘बंद’ आंदोलन करण्यावर संघटना ठाम

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा आर्थिक घडी सावरण्यासाठी असणारा उत्तम पर्याय आहे. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

त्यामुळे दुधाला किमान ३० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी दूध उत्पादकांनी एक ऑगस्टपासून दूधपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला होता.

याची दखल घेऊन दुग्धविकासमंत्र्यांनी मंत्रालयात शेतकरी प्रतिनिधींची बैठक घेतली. यासंबंधी सरकार योजना आणत असून, लवकरच ती जाहीर केली जाईल,

असे आश्वासन त्यांनी दिले होते परंतु दूध दरासंबंधी तोडगा काढण्यासाठी सरकारसोबत झालेल्या पहिल्या बैठकीनंतर सरकारकडून काहीच प्रतिसाद मिळालेला नाही.

त्यामुळे एक ऑगस्टपासून राज्यात ‘दूध बंद’ आंदोलन करण्यावर शेतकरी संघटना ठाम आहेत. विविध संघटनांच्या ऑनलाइन संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे,’

अशी माहिती सूकाणू समितीचे सदस्य अनिल देठे पाटील यांनी दिली. एक ऑगस्टपासून राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आपल्याकडील दूध कोणत्याही दूध संस्थेला, दूध संघांना देणार नाहीत.

त्या दुधातून आपापल्या गावातील चावडीवर सामुहिकपणे दुग्धाभिषेक आंदोलन केले जाईल. हे आंदोलन स्वयंशिस्त व सुरक्षित अंतराचे नियम पाळून केले जाईल. उरलेले दूध समाजातील गरजू लोकांना मोफत वाटण्यात येईल.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24