अहमदनगर लाईव्ह24 टीम :- राहुरी तालुक्यातील मु.पो. कोंढवड येथील शुभम किशोर बनसोडे यांची आत्महत्या नसून त्याला जिवे ठार मारल्याचा संशय बनसोडे कुटुंबीयांनी व्यक्त केला असून त्या आरोपींवर कारवाई करण्यात यावी.या मागणीसाठी बनसोडे कुटूंबियांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणात नीता किशोर बनसोडे, रविना बनसोडे, जनाबाई शेजवळ, करुणा बनसोडे, सुनील चक्रनारायण यांचा समावेश आहे. पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर बसलेल्या उपोषणार्थीनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शुभम बनसोडे यांची आत्महत्या नसून त्याला ठार मारले असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.वारंवार राहुरी पोलीस स्टेशन येथे चौकशी करून पाठपुरावा करत आहोत.
पोलिस स्टेशनला तक्रार अर्ज सादर केले.गावातील काही व्यक्ती सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे.आमच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा संशय येत असून आमचा मुलगा शुभम याचे जसे झाले तसे आमचे ही होईल की काय? अशी भीती व्यक्त केली आहे.संशयित कुटुंब आमच्या कुटुंबावर वारंवार हल्ला करून दहशत निर्माण करत आहे.
सलग तीन वेळेस आमच्या कुटुंबावर हल्ला झाला आहे.त्याबाबत राहुरी पोलिसांनी फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल करून आरोपींना अभय दिले आहे.शुभम बनसोडे यांच्या मृत्यूचे कारण खोटे असून मृत्युनंतर केलेला पोस्टमार्टम सुद्धा खोटा आहे.
कारण मुलाच्या अंगावरील जखमाची कुठेच नोंद न करता कपड्यावर रक्त सापडल्याची नोंद कशी काय असू शकते? मृताचे दात पडले,चेहरा काळानिळा असणे व अंगावर गंभीर जखमा दिसल्या.पोलिसांनी मृताचा पंचनामा व फोटो मागणी करूनही आम्हाला दिलेली नाही.त्यामुळे तातडीने शुभम बनसोडे यांचा मृत्यूचा तपास स्वतंत्र यंत्रणेमार्फत करण्यात यावा व दोषींवर कठोर कारवाई करावी.असे निवेदनात नमूद केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com