सहा अनधिकृत प्रयोगशाळा चालकांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटीस

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- पॅरावैद्यक परिषदेची नोंदणी नसलेल्या अनधिकृत प्रयोग शाळा आढळून आल्या आहेत. दरम्यान हा धक्कादायक प्रकार पाथर्डी तालुक्यातील तिसगावमध्ये उघडकीस आला आहे.

तिसगाव तालुका आरोग्य अधिकारी यांच्या सुचनेनुसार तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर्गत कार्यरत असलेल्या सहा अनधिकृत प्रयोगशाळा चालकांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटीस बजावल्या आहेत. दरम्यान पॅरावैद्यक परिषदेचे नोंदणीपत्र अतितत्काळ सादर करा.

नोंदणीपत्र नसताना खासगी प्रयोगशाळा सुरू असल्याचे आढळून आल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा इशाराच या नोटिसीद्वारे देण्यात आला आहे.

आरोग्य विभागाने नोटीस बजावल्यानंतर अनधिकृत प्रयोगशाळांकडून रुग्णांना देण्यात येणारा तपासणी अहवाल आता साध्या कागदांवर किंवा थेट संबंधित डॉक्टरांच्या मोबाईलवर कळविला जात असल्याचे चित्र आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पॅरावैद्यक नोंदणीसाठी आवश्यक असलेले स्थानिक ग्रामपंचायत, नगर परिषदेचा परवाना, वैद्यकीय घनकचरा विल्हेवाट पारपत्र या अनधिकृत प्रयोगशाळा चालकांकडे नसल्याची बाब वैद्यकीय सर्वेक्षणाअंती समोर येत आहे.

यामुळे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर्गत कार्यरत असलेल्या सहा खासगी प्रयोगशाळांना प्रशासनानं नोटीस बजावल्या आहेत. नोंदणी नसताना, नोटीस बजावूनही प्रयोगशाळा सुरू असल्याचे आढळून आल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील.

अहमदनगर लाईव्ह 24