निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी गैरहजर राहणाऱ्या दांडीबहादरांना नोटीस

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील 27 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली असून 6 जानेवारी रोजी मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण पार पडले असून प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळण्यासाठी प्रत्यक्षपणे दररोज तहसील कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहे.

पहिले प्रशिक्षण खा. गोविंदराव आदिक सांस्कृतिक सभागृहात पार पडले. पहिल्या प्रशिक्षणासाठी 15 केंद्राध्यक्ष, 27 सहायक केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी (वर्ग दोन) 31 , (वर्ग तीन) 19 तर 31 शिपाई अशा 123 कर्मचार्‍यांनी दांडी मारली आहे.

त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तालुक्यातील 27 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले.

त्यात प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी एकेक मतदान केंद्राध्यक्ष, सहायक केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी दोन व तीन तसेच एक शिपाई असे 850 कर्मचारी नियुक्त केले आहेत.

दरम्यान येत्या 15 जानेवारी रोजी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतिची निवडणुक होत आहे.130 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी 850 मतदान अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24