‘त्यांची’ अधोगती सुरु, आता ‘त्यांनी’ चांगला ज्योतिषी शोधावा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम /  अहमदनगर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, महाआघाडी सरकार सहा महिन्यांच्यावर टिकणार नाही. विधानसेभेत २२० पेक्षा जास्त जागा येतील, विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेता निवडण्यायोग्य सुद्धा जागा येणार नाही. त्यामुळे फडणवीसांचे कोणतेच भाष्य खरे होत नाही.

त्यांनी चांगला भविष्यकार शोधावा. तसेच त्यांनी पक्षात भरपूर आवक करून घेतली आहे. आता त्यांना सगळ्यांना संभाळण्याची जबाबदारी फडणवीसांची असून, भाजपची अधोगती सुरु झाली असल्याचे दिसत आहे. अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे नगर येथील शासकीय विश्रामगृह येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ना.थोरात पुढे म्हणाले की, भाजप सरकारच्या काळात विदर्भासह राज्यात अनेक शेतकऱ्­यांनी आत्महत्या केली. ही नेहमीच चिंतेची बाब राहिली आहे.

फडणवीसांनी केवळ भाषणेच केली. त्यांनी कुठलीही कर्ज माफी दिली नाही. आमच्या काळात आत्महत्या कमी झाल्या होत्या. पण मध्यंतरी त्यात पुन्हा वाढ झाली, असली तरी आता महाविकास आघाडी कर्जमाफी आदी योजना राबवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे.

आरोप करायचा पिंड हा अनेक वर्षे विरोधातच राहिलेल्या भाजपचा राहिला आहे. आता पुन्हा ते विरोधात बसल्याने आम्ही केलेल्या चांगल्या कर्जमाफीला विरोध करत आहेत. जवाहरला नेहरू विद्यापीठात जे घडले व तेथे विद्यार्थ्यांना मारहाण झाली, खरतर त्याचा निषेध देशातील सर्वच नागरिकांनी केला पाहिजे.

तो लोकशाहीवर हल्ला असल्याचे मी मनतो. जवहारलाल नेहरु विद्यापीठाचे वैशिष्ट्य वेगळे आहे. त्याला वैचारीक अशी वेगळी पार्श्वभूमी राहिली आहे. विशेषत: पुरोगामी विचारांचे मंथन सुरु असते.

कन्हैयाकुमार सारखा गरीब कुटुंबातील मुलगा त्या विद्यापीठातून पुढे आला असल्याचे आपन सर्वजण पाहतो. असे वैचारीक मंथन कोणाला थांबावसे वाटत असेल, तर ती प्रक्रीया देशाच्या विकासासाठी घातक आहे. पुरोगामी विचारच देशाला पुढे घेणून जातात. असे मत थोरात यांनी व्यक्त केली.

हे पण वाचा :- डोळ्यांना दिसतील अशीच कामे करायचीत रोहित पवारांची राम शिंदे यांच्यावर टीका !

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24