अहमदनगर Live24 ,30 मे 2020 :- पारनेर ठाण्याहून हिवरे कोरडा येथे आलेल्या ४६ वर्षांच्या व्यक्तीसह त्याच्या १८ वर्षांच्या मुलीसही कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे तालुक्यातील रुग्णसंख्या चार झाली आहे.
हे सर्व रुग्ण मुंबई, ठाणे येथील कोरोनाबाधित क्षेत्रातून आले आहेत. हिवरे कोरडा येथील रुग्णाची दुसरी १६ वर्षीय मुलगी, पत्नीसह संपर्कातील इतर आठ व्यक्तींचे तपासणी अहवाल मात्र निगेटिव्ह आले.
दरम्यान, कुलाबा येथून निघोज येथे आलेल्या एकास ताप येऊ लागल्याने त्याला नगर येथे तपासणीसाठी हलवण्यात आले आहे. हिवरे कोरडा येथील व्यक्ती कुटुंबासह गावात दाखल झाल्यानंतर संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले होते.
तरुणास श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यास नगर येथे नेऊन घशातील स्त्राव घेण्यात आला. तो पॉझिटिव्ह आल्यानंतर संपर्कातील आठ व्यक्तींचाही स्त्राव घेण्यात आला. मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
संपर्कातील ९ पैकी टाकळी ढोकेश्वर येथील सहा नातेवाईकांनी बाधित व्यक्तीसमवेत प्रवास केला होता. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. माळकूप येथील व्यक्तीस कोरोनासदृश त्रास होऊ लागल्यामुळे नगरला दाखल केले होते. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com