अर्बन बँकेला झालेल्या ‘त्या’ दंडाला अधिकारीही जबाबदार, माजी सरकारी अधिकाऱ्यांचे मत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :  अर्बन बँकेला झालेल्या 40 लाख रुपयांच्या दंडाला बँकेचे व्यवस्थापक व इतर अधिकारीही जबाबदार आहेत, असे मत माजी जिल्हा समाज कल्याण अधिकारी व अर्बन बँकेचे सभासद रफिक मुन्शी यांनी व्यक्त केले.

कोणतेही ठराव बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत होत असतात. त्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचे काम अधिकाऱ्यांचे म्हणजेच प्रशासनाचे आहे.

‘आरबीआय’च्या नियमांचे उल्लंघन होते की नाही , हे पाहणे प्रशासन, अधिकारी , बँकेचे व्यवस्थापकांचेही काम आहे. त्यामुळे बँकेचे अध्यक्ष , संचालकांप्रमाणेच त्यांचीही काही जबाबदारी आहे की नाही, असा सवाल मुन्शी यांनी केला आहे.

नगर अर्बन बँकेच्या अनियमित कारभाराबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नगर अर्बन बँकेला ४० लाख रुपयांचा दंड ठोठावला.  यामध्ये बँकेचे प्रशासक, माजी अध्यक्षांची भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे बँकेचे सभासद संभ्रमात आहेत.

त्यामुळे एक सभासद या नात्याने माझी ही भूमिका मांडत असल्याचे मुन्शी म्हणाले. ते म्हणाले की, मीही एक अधिकारी आहे. जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती आणि मी एक अधिकारी असे अनेकवेळा निर्णय घेण्याचे प्रसंग आले. सभापतींनी काहीही ठराव केले तरी ते नियमात बसतात

की नाही, हे आम्ही आधी पाहत होतो. सभापती किंवा समितीने ठराव केले तरी ते चुकीचे आहेत की बरोबर, याची पडताळणी करणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी असते.

त्याचप्रमाणे बँकेतही आहे. बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळाने जे काही ठराव केले, निर्णय घेतले, ते योग्य की अयोग्य आहे, याची पडताळणी अधिकार्‍यांनी करणे आवश्यक होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24