अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या १९ जागेसाठी होणार्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरु होती.
दरम्यान या सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी १७८ अर्जांची विक्री झाली. विद्यमान संचालक मंडळासह तब्बल १२० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
गुरुवारी सकाळी अकरा वाजता दाखल उमेदवारी अर्जांची छाननी प्रांताधिकारी कार्यालयात होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी देवदत्त केकाण यांनी दिली.
‘ब’ वर्ग सहकारी संस्था मतदारसंघातून ज्येष्ठ नेते आप्पासाहेब राजळे, आमदार मोनिका राजळे, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे यांच्यासह एकूण दहा अर्ज दाखल झाले आहेत.
महिला प्रतिनिधींमधून यांचे अर्ज दाखल महिला प्रतिनिधी मतदारसंघातून आमदार मोनिका राजळे यांच्यासह विद्यमान संचालिका सिंधूबाई महादेव जायभाय, वत्सलाबाई कारभारी कचरे, कारखान्याचे दिवंगत संचालक पांडुरंग खेडकर यांच्या पत्नी उषाताई खेडकर, अन्य नऊ महिला प्रतिनिधींचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
कारखाना परिसरातील विविध गावातूनच उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या इच्छुकांची संख्या जास्त आहे. कारखान्याच्या सहा गटांपैकी कासार पिंपळगाव १२, चितळी गटातून १६, कोरडगाव- १४, मिरी ११, टाकळीमानूर १८ तर पाथर्डी गटातून केवळ तीन अर्ज दाखल झाले आहेत.