अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : जामखेड तालुक्यात पुन्हा एकदा कोरोणाचा शिरकाव झालाय आणि यावेळी जावई जामखेड करांसाठी त्रासदायक ठरला आहे.
कोरोना चा अहवाल येताच या व्यक्तीच्या संपर्कातील जवळके गावातील त्याच्या सात नातेवाईकांना नगर येथे हलविण्यात आले आहे.
मुंबईला सासर्याला भेटायला गेलेल्या तालुक्यातील जवळके येथील एका व्यक्तीला करोनाची लागण झाली असून त्याचा रिपोर्ट बुधवार दि. 24 रोजी पॉझिटिव्ह आल्याची माहिती जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज खराडे यांनी दिली.
संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील सात नातेवाईकांना नगर येथे हलविण्यात आले आहे. जवळके येथील 30 वर्षीय युवक मुंबई येथे सासर्याला भेटायला गेला होता.
तो युवक 21 जून रोजी जवळके गावात आला. याची माहिती करोना ग्राम समितीला मिळाल्याने या युवकाला खर्डा येथे क्वारंटाईन करण्यात आले.
क्वारंटाईन झाल्यानंतर या व्यक्तीला अस्वस्थ वाटल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज खराडे यांनी दिली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews