धक्कादायक:- लग्नाचे आमिष दाखवून अविवाहित युवकाची दीड लाखांची फसवणूक !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर : लग्नाचे आमिष दाखवून अविवाहित युवकाला युवतीने सुमारे दीड लाख रुपयांचा आर्थिक गंडा घातला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात रेखा निलेश कदम (रा. आकृती बिल्डिंग, मार्केट जवळ, वाशी, नवी मुंबई) या नावाच्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, हनुमान मोहनराव काळे (वय ३०,रा. सारोळा, ता.जामखेड) या युवकास १६ नोव्हेंबर २०१८ ते १३ डिसेंबर २०१९ दरम्यान रेखा कदम नावाच्या व्यक्तीने ऑनलाइन जीवनसाथी वेबसाइटवरून संपर्क केला.

व्हाट्सअप द्वारे चॅटिंग करून लग्नाचे आमिष दाखवले, एक लाख ६५ हजार रुपयांचे रोख रक्कम घेऊन काळे यांची आर्थिक फसवणूक केली.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हनुमान काळे यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात हनुमान काळे यांच्या फिर्यादीवरून रेखा कदम नावाच्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24