शेततळ्यात पडून एकाचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- राहाता तालुक्यातील निर्मळ पिंप्री परिसरात राहणारे सोपान हरिभाऊ घोरपडे, वय ६० वर्ष हे शेततळ्याच्या पाण्यात पडून मयत झाले आहे. त्यांना उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते.

मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासले असता सोपान हरिभाऊ घोरपडे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झालेला होता. प्रवरा हॉस्पिटलचे डॉ. स्वप्नील यांनी ‘लोणी पोलिसात तशी खबर दिल्यावरून पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

तसेच सोपान हरिभाऊ घोरपडे हे शेततळ्यात कधी पडले? कसे पडले? याचा पुढील तपास सपोनि पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे.काँ. रोकडे हे करीत आहे.

शेततळ्यात नेमके किती पाणी होते? सोपान घोरपडे यांना पोहता येत होते का? त्यांना शेततळ्यात पडल्याचे कोणी पाहिले? याचा तपास सुरू असल्याचे लोणी पोलिसांनी सांगितले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24