Ahmednagar Breaking : दुचाकीसह विहिरीत पडल्याने एकाचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Breaking : जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी केलवड येथे आलेले पाहुणे कार्यक्रम आटोपून संगमनेरातील कौठे कमळेश्वर येथे आपल्या गावी घराकडे दुचाकीवरून जात असताना शिर्डी विमानतळ रस्त्यावरून दुचाकी रस्त्यालगतच्या विहिरीत पडली.

या घटनेत भरत शंकर भडांगे (वय ३२, रा- कौठे कमळेश्वर, ता- संगमनेर) या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

राहाता तालुक्यातील केलवड गावातून शिर्डी विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारील तलावा लगत सोमवारी (दि.२२) रात्री ९ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. केलवड येथील साई संस्थान कर्मचारी रावसाहेब वाघे यांच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता.

या कार्यक्रमासाठी मयत भडांगे व त्यांच्या सोबतचे व्यक्ती आले होते. भडांगे यांच्यासोबत दुचाकीवर ३ व्यक्ती होते.

आपल्या घरी परतत असताना रात्रीच्या अंधारात हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. घटना समजल्यानंतर केलवड गावातील नागरिकांकडून अपघात ग्रस्त दुचाकीस्वरांना श्री साईबाबा संस्थांच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

परंतु औषध उपचारापूर्वीच भरत भडांगे मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले व घटनेतील दुचाकीवर असणाऱ्या इतर दोघांवर उपचार सुरू आहेत.

राहाता ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटने प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस सहायक फौजदार एन. यु. पटारे करीत आहेत.