ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : डोक्यात फर्शी घालून एकाचा खून

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmadnagar Breaking : डोक्यात फर्शी घालुन एकाचा खून झाल्याची घटना श्रीरामपूर शहरातील नॉर्दन ब्रांच परिसरात एका हॉटेलच्या पाठीमागे काल बुधवारी (दि.४) सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख उस्मान शहा ऊर्फ गाठण (वय 28, रा. वार्ड नं. दोन, श्रीरामपूर), असे मयत तरुणाचे नाव आहे. आरोपीने डोक्यात फर्शी घालुन हा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

या घटनेनंतर बघ्याची घटनास्थळी एकच गर्दी झाली होती. तसेच तात्काळ शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी करुन मृतदेह रुग्णालयात हलवण्यात आला.

दरम्यान, खूनाच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे व पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली.

याप्रकरणी शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून रात्री उशीरा पर्यंत पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Ahmednagarlive24 Office