Ahmednagar Breaking : गवंडी कामाच्या मजुरीचे राहिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून चार आरोपींनी दगड दांड्याने मारहाण करून खून केल्याप्रकरणी चार जणांना येथील तालुका पोलिसांनी एका तासात मुद्देमालासह जेरबंद केले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.११) सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास येसगाव (ता. कोपरगाव) येथील कमानी जवळ मयत दिपक दादा गांगुर्डे ( वय ४०, गवंडी कामगार, रा. अचानक नगर, येसगाव) यास उषा सुनिल पोळ, स्नेहा सुनिल पोळ, राज उर्फ बबलु सुनिल पोळ,
आण्णा उर्फ अनिल प्रमोद गायकवाड (सर्व रा. येसगाव, ता. कोपरगाव) यांनी गवंडी कामाचे मजुरीचे राहिलेले पैसे मागितलेच्या कारणावरुन मयत दिपक दादा गांगुर्डे यास लाथाबुक्यानी दगडाने मारहाण करुन लाकडी दांड्याने डोक्यात व शरीरावर ठिकठिकाणी घाव करुन जबर जखमी करुन खून करून पसार झाले होते.
या घटनेबाबत मयताची पत्नी नामे जया दिपक गांगुर्डे ( वय ३४, रा. अचानक नगर, येसगाव) यांचे फिर्यादी वरुन तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी अत्यंत तातडीने घटनास्थळी पोहचुन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तयार करून
आरोपींचा शोध घेत असताना, पोलीस देसले यांना गोपनिय बातमी मिळाली की, सदरचे आरोपी हे स्मशाभुमीचे जवळ, झाडामध्ये लपुन बसलेले आहे. त्यानुसार पोलिसांनी स्मशानभूमी परिसर पिंजून काढून सर्व आरोपींना शिताफीने तासाभरात पकडले आहे.