अहमदनगर ब्रेकिंग : पत्रकार चौकात भीषण अपघातात एक ठार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मध्य शहरातून सावेडीकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला  डीएसपी चौकाकडून येत असलेल्या टँकरची त्यांना जोराची धडक बसली.

यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे . टँकर अंगावरून गेल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला. 

त्यांच्या अंगावरून वाहन गेल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. अपघात होताच पत्रकार चौकात मोठी गर्दी झाली. अपघात एवढा भयानक होता की टँकरचे चाक पूर्णपणे अंगावरून गेले.

दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शहरातून जड वाहतुकीला बंदी असतानाही वाहने शहरातून जात आहेत. त्यात पत्रकार चौकात नेहमीच मोठी गर्दी असते.

गाडीच्या क्रमांकावरून वाहन चालकाचा शोध घेतला असला दुचाकीचालकाच्या मालकाचे नाव कमलेश अनिल पटवा असे आहे. मात्र अपघातात नक्की गेले कोण, याची अद्याप ओळख पटलेली नाही.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24